सांगली : माणिकनाळ येथे शेतातून गांजाची ७८ झाडे जप्त

त्यांची किंमत सुमारे १३ लाख ३९ हजार १०० रुपये होते
sangli
sanglisakal

जत : माणिकनाळ येथे महासिद्ध लक्ष्मण बगली याच्या डाळिंबाच्या बागेत १३३ किलो ९१ ग्रॅम वजनाची गांजाची ७८ झाडे उमदी पोलिसांनी जप्त केली. त्यांची किंमत सुमारे १३ लाख ३९ हजार १०० रुपये होते. आज दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयित बगली पसार झाला.

उमदी ठाण्यात पोलिस नाईक श्रीशैल बिसलाप्पा वळसंग यांनी फिर्याद दिली असून पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.उमदी पोलिसांचे एक पथक संशयिताचा शोध घेत आहे.पोलिसांनी माहिती दिली, की माणिकनाळपासून एक किलोमीटरवर असलेल्या महासिद्ध लक्ष्मण बगली याच्या डाळिंब बागेत बेकायदेशीरपणे गांजाची लागल्याची माहिती गोपनीयरित्या उमदी पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने बगली यांच्या डाळिंब बागेत छापा टाकला असता पाच ते सहा फूट उंचीची ७८ झाडे आढळली.

त्यांचे पंचासमक्ष वजन केले असता १३३ किलो ९१ ग्रॅम इतके वजन झाले असून त्याची बाजारभावाप्रमाणे १३ लाख ३९ हजार १०० रुपये इतकी किंमत होते. हा मुद्देमाल उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईची माहिती लागताच महासिद्ध बगली पसार झाला आहे.

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, हवालदार नितीन पलूसकर, नामदेव काळेल, पोलिस नाईक श्रीशैल वळसंग, पूजा घार्गे, पोलिस शिपाई शिवाजी हाके, सिद्धेश्वर मोरे, महेश स्वामी, सोमनाथ पोटभरे, आप्पा घोडके, आप्पा कुंभारे यांनी कारवाईत भाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com