Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
esakal
सांगली : गणपती पंचायतन संस्थान ॲक्ट व गॅझेट १९४० च्या कलम ५ नुसार, पूर्वजांनी निश्चित केलेले नियम व अटी तसेच पटवर्धन घराणे आणि सांगली संस्थानच्या पूर्वापार रूढी, परंपरा व चालीरीती आजही महत्त्वाच्या (Sangli Ganpati Panchayatan Sansthan) आहेत. संस्थानच्या वारसाहक्काबाबतही तरतुदींनुसार प्रक्रिया करून युवराज आदित्यराजे यांना कायदेशीररीत्या दत्तक घेण्यात आले आहे. त्यामुळे संस्थानचे वारस युवराज आदित्यराजेच असल्याचे स्पष्टीकरण विजयसिंहराजे पटवर्धन यांनी केले आहे.