

दुचाकीस्वारावर बसलेल्या सहकारी मित्रानेच पाठीमागून गोळ्या झाडल्याची घटना पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येडेनिपाणी फाटा येथे घडली.
esakal
Sangli Crime News : दुचाकीस्वारावर बसलेल्या सहकारी मित्रानेच पाठीमागून गोळ्या झाडल्याची घटना पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येडेनिपाणी फाटा येथे घडली. यात दुचाकी चालक अर्जुन शंकर थोरात (वय ५३) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या शरीरात तीन गोळ्या लागल्या, तर दोन गोळ्या घासून गेल्या अशी घटनास्थळी चर्चा आहे. भर दुपारी गजबजलेल्या परिसरात हा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.