सांगली : पलूस शहरात जोरदार पाऊस

जोरदार वारा आणि पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता.
पाऊस
पाऊस Sakal

पलूस - पलूस शहरासह परिसरात रविवारी पहाटे जोरदार वादळी पाऊस पडला. जोरदार वारा आणि पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. पलूस तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. काही वेळ ढगाळ वातावरण तयार होत होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. अखेर आज रविवारी पहाटे विजांच्या कडकडाटांसह वारा आणि पाऊस सुरू झाला. जवळजवळ तासभर हा पाऊस पडला.

पहाटे अचानक पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. आज दिवसभर हवेत थोडा गारवा होता. बरेच दिवसांत आज उन्हाची तीव्रता कमी झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पलूस, कुंडल, आंधळी, सांडगेवाडी, सावंतपूर, विठ्ठलवाडी, आमणापूरसह ईतर गावात हा वादळी पाऊस पडला. दरम्यान, या पावसामुळे सकाळपर्यंत विजपुरवठा खंडित होता. तर काही ठिकाणी शिल्लक द्राक्षाचे व बेदाण्याचे नुकसान होणार आहे. सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. तर ऊस पिकास हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com