सांगलीत प्रबळ अपक्षांना 'पुरस्कृत'चे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, सुधार समितीकडून हालचाली

सांगली: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडून डावलल्या गेलेल्या प्रबळ अपक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न एकीकडे सुरु असताना त्यांना "पुरस्कृत' म्हणून रिंगणात उतरवण्यासाठी शिवसेना, स्वाभिमानी आघाडी आणि सांगली सुधार समितीच्या हालचाली सुरु झाली आहेत. यातील काही मंडळी हाताला लागली तरी मोजक्‍या ठिकाणी प्रमुख स्पर्धक म्हणून या तिन्हीही संघटनांना चर्चेत येता येईल.

उमेदवारी अर्ज माघारीची मंगळवारी (ता. 17) अंतिम मुदत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, सुधार समिती, स्वाभिमानी आघाडी, जनता दलाचे असे एकत्रित 247 उमेदवार रिंगणात आहेत. छाननीनंतर 574 अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होताना अनेक मातब्बरांच्या दांड्या उडाल्या आहेत. 43 विद्यमानांना संधी मिळाली असली तर 31 विद्यमान सदस्यांना डावलले गेले आहे. सांगलीवाडी, मिरजेतील एका प्रभागात दोन्ही काँग्रेस मैत्रीपूर्ण लढताहेत, मात्र अन्यत्र नाराजीची घंटा वाजू लागली आहे. भाजपने सर्व 78 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तरी पक्षातील अनेक निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त करत अर्ज ठेवलेला आहे. काँग्रेस 46, राष्ट्रवादी काँग्रेस 29 आणि पाच ठिकाणी मैक्षिपूर्ण लढती होत आहेत.

शिवसेना पक्षाकडून 51 उमेदवार रिंगणात आहेत. आणखी 27 जागांवर ते पुरस्कृत उमेदवार देऊ शकतात. सुधार समितीचे 18 उमेदवार आहेत. त्यांना मोठी संधी आहे. स्वाभिमानी आघाडीने 12 उमेदवार दिले असून आणखी किमान 13 जण पुरस्कृत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जनता दलाचे 9 उमेदवार रिंगणात असून त्यांनी सुधार समितीसोबत आघाडीची चर्चा सुरु केली आहे. त्यात आणखी काही वाढ होऊ शकते.
अपक्ष उमेदवारांमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी, भाजपमधील नाराजांची संख्या मोठी आहे. सर्व प्रभागात सुमारे 574 अपक्ष उमेदवार आहेत. त्यातील ताकदीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवून पुरस्कृत करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. पक्ष आणि आघाड्यांनी अपक्षांना पुरस्कृत केले तरी त्यांचे निवडणूक चिन्ह मिळणार नसले तरी प्रभागात चारही उमेदवार मिळाल्याने त्यांची ताकद वाढू शकते. त्याचा फटका त्या पक्षाला बसण्याची शक्‍यता निर्माण होते.

Web Title: sangli independent party politics