Sangli Special Rescue Force rescue operation
esakal
कवठेमहांकाळ : ऊसतोडीसाठी आलेली एक महिला मजूर आणि तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या बालकाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना उघडकीस आली. देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील देसाई वस्ती परिसरात ही दुर्घटना घडली. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या धाडसी व कौशल्यपूर्ण कार्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही काही मिनिटांत महिला व तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या बालकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात (Sangli woman and two year old child drowned) आला.