Sangli : खानापूर शहराच्या प्रवेशव्दारी कचऱ्याचा खच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli : खानापूर शहराच्या प्रवेशव्दारी कचऱ्याचा खच

Sangli : खानापूर शहराच्या प्रवेशव्दारी कचऱ्याचा खच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खानापूर : दिवाळीनंतर खानापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून हे कचऱ्याचे ढीग कधी उचलले जाणार हीच नागरिकांसमोर समस्या आहे. शहराच्या प्रवेशद्वारातच केएलई महाविद्यालयानजीक रस्त्याकडेला कचऱ्याचा ठिकठिकाणी ढिगारा पसरला आहे . यामुळे स्वच्छ -सुंदर खानापूरच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. दुर्गंधी पसरल्याने पादचाऱ्यांना नाक धरून चालण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

केएलई महाविद्यालयानजीक रस्त्याच्या कडेला तीन ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पसरले आहेत.यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक, सडका भाजीपाला याचा कचरा आहे. दिवसागणिक कचरा वाढू लागल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. वेळीच कचऱ्याची उचल नझाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे.

लगतच महाविद्यालय असल्याने त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हा भाग कोणाच्या कार्यक्षेत्रात येतो याबद्दलही मोठा वादाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समर्थनगर हा भाग खानापूर नगर पंचायत कार्यक्षेत्रात तर हिंदूनगर हा भाग रामगुरवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो. गांधीनगर आणि त्यासमोरील भाग हलकर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येतो. पण दोन्ही ग्रामपंचायतीने हा भाग आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगून कचरा उचलण्याबाबत जबाबदारी झटकली आहे. जबाबदारीच्या घोळात कचऱ्याचे ढीग मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि येथील जनतेचा आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार?

मुक्या प्राण्यांचे जीवही धोक्यात

या कचऱ्याची उचल करणारी यंत्रणा आजघडीला तरी नाही.याची उचल कोण करायची हा प्रश्न आहे. रामगुरवाडी ग्राम पंचायत, हलकर्णी ग्राम पंचायत की नगर पंचायत या घोळात कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हाच कचरा दिवसभर भटकून पोट भरणाऱ्या गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कावळे, नागरी वस्तीतील अन्य पक्ष्यांच्या प्रजाती, कुत्री, मांजरे यांच्या पोटात जातो. एके दिवशी हाच कचरा या प्राण्यांचा शेवट करतो.नागरिकांना होणाऱ्या त्रासाबरोबरच मुक्या प्राण्यांनाही प्राण गमवावा लागत आहे.

गांधीनगरसमोरील रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याचा ढिगाऱ्यामुळे विद्यार्थी आणि जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याची बाब ग्रामपंचायतीला माहीत आहे. पण ही जागा सरकारी गायरान असल्यामुळे महसूल खात्याने ती हलकर्णी ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे. ग्रामपंचायतीतर्फे ही जागा स्वच्छ ठेवून गाळे बांधून पर्यायाने ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.

- अश्पाक अत्तार, ग्रामपंचायत सदस्य, हलकर्णी

(बातमीदार - हणमंत गुरव खानापूर)

loading image
go to top