
Man Killed By Friends : कुपवाड येथील रामकृष्णनगर परिसरात कौटुंबिक कारणातून मित्राचा भोसकून खून करण्यात आला. अमोल सुरेश रायते (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वर्षभरातील कुपवाडमधील हा सातवा खून आहे. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.