
Leopard Attacks : पेठ-सांगली महामार्गावर आष्टा येथील राज पेट्रोल पंपासमोर आज (ता. २३ ) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांवर बिबट्याने झडप मारली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन तरुण इस्लामपूरच्या बाजूने आष्ट्याकडे निघाले होते. अचानक त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. हा सर्व प्रसंग दुचाकीच्या पाठीमागून मोटारीतून निघालेल्या आष्टा येथील सागर जगताप यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.