Loksabha Election : सांगलीच्या आखाड्यात उमेदवारी कोणाला? धक्कातंत्र की पुन्हा संजयकाका? उत्सुकता शिगेला

सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha Constituency) लढत कोणाची कोणासोबत, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
Sangli Loksabha Constituency politics
Sangli Loksabha Constituency politicsesakal
Summary

निर्णय दिल्लीत असला तरी भाजपमध्ये ‘ग्राऊंड झिरो’ला खूप महत्त्व असते. हाच भाजप आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमधला मूलभूत फरक आहे.

Sangli Loksabha Constituency Politics : सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha Constituency) लढत कोणाची कोणासोबत, याबाबत अद्याप संभ्रम आहे. भाजपप्रणित (BJP) महायुतीविरोधात महाआघाडीची लढत हे निश्‍चित आहे. या घडीला पक्षीय पातळीवर भाजप लढणार, एवढेच निश्‍चित आहे. विरोधात महाआघाडीची उमेदवारी काँग्रेस की शिवसेना, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. लोकसभेचे मैदान उंबरठ्यावर असताना जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्‍या अंतर्गत हालचालीवर टाकलेली ही धावती नजर...

महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून जुंपलेली असताना भाजपमध्येही घालमेल सुरू आहे. खासदार संजय पाटील यांना भाजप तिसऱ्यांदा संधी देणार की नवा चेहरा मैदानात उतरवणार, याबाबत चर्चांना धुमारे फुटले आहेत. नवनव्या नावांवर चर्चा झडू लागली आहे. पूर्वी जे काँग्रेसमध्ये (Congress) व्हायचे, तसेच आता भाजपमध्ये होत आहे.

Sangli Loksabha Constituency politics
Loksabha Election : सांगली मतदारसंघ ठाकरे गटाकडं जाणार? काँग्रेस आमदार म्हणाले, यापूर्वी तीन वेळा कदम कुटुंबाला..

इथल्या नेत्यांनीच जाहीर केलेय, पश्रश्रेष्ठी देतील त्याचा आम्ही प्रचार करू. काकांना पर्याय म्हणून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सुधीर गाडगीळ, माजी शहराध्यक्ष दीपक शिंदे आणि अगदीच शेवटचा पर्याय म्हणून संग्रामसिंह देशमुख यांची नावे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात चर्चेत आहेत. अर्थात निर्णय दिल्लीतच होईल आणि त्यासाठी काकांनी चौफेर तटबंदी केली आहे.

Sangli Loksabha Constituency politics
Loksabha Election : शाहू छत्रपतींबद्दल आदरच, पण महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू - मुश्रीफ

भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीने ‘दिल्लीचा आदेश शिरसावंद्य,’ असे जाहीर केलेय. विलासराव जगताप यांनी मांडलेल्या ठरावाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले. या दोघांचे खासदार संजय पाटील यांच्याशी असलेले ‘सख्य’ जगजाहीर. महत्त्वाच्या मुद्द्यांवर समझोता झाला असून, ‘आमचं मिटलंय’ असे सांगितले जातेय. आता ते प्रचारात दिसेल का, हे पाहावे लागेल. पक्षाने निरीक्षक म्हणून मूळचे काँग्रेसी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पाठवले होते. त्यांच्यासमोर १२२ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे आपली मते मांडली. उमेदवार कोण असावा, कोणाला विरोध, पर्यायी नाव, असे प्रश्न‍ विचारले गेले. तो गोपनीय अहवाल दिल्ली दरबारी पोहोचलाय.

Sangli Loksabha Constituency politics
'कागल' ठरणार लोकसभेचा केंद्रबिंदू; समरजित घाटगेंना भाजपची उमेदवारी शक्य, शिवसेनेकडून मंडलिकांसाठी दावा

आता फैसला अर्थात अमित शहा करतील. त्या अहवालात अनेक माजी आणि विद्यमान आमदारांनी आपली ‘दुखणी’ मांडली आहेत. पक्षातल्या आजी आणि भावी आमदारांना श्रेष्ठींनी, ‘तुमचा लोकसभेचा परफॉर्मच तुमचे विधानसभेचे तिकीट ठरवेल,’ अशी स्पष्ट तंबी दिली आहे. दुसरीकडे, खासदार पाटील उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मर्जीत असल्याने निर्धास्त आहेत. शिवाय दहा वर्षांची त्यांची दिल्लीतील आणि योगी आदित्यनाथांशी जवळीक आहेच. उमेदवारीची खात्री असल्याचा आत्मविश्‍वास ते सतत चेहऱ्यावर दाखवत असतात.

Sangli Loksabha Constituency politics
Sangli Loksabha Constituency politics

खासदारांनी दहा वर्षांत पक्षीय पातळीवर काय केले असेल, तर प्रत्येक तालुक्यात त्यांचा म्हणून भाजपचा गट तयार केला आहे. तेच त्यांचे पक्षविस्ताराचे कार्य आहे. शिवाय ते नेहमीच विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीतील पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकत ‘काय राजा, कसं काय?’ अशी साखरपेरणी करीत असतात. थोडक्यात, पक्षांतर्गत विरोधकांवर त्यांची ती पर्यायी औषधयोजना आहे, जी त्यांनी वेळोवेळी केली आहे. हे नक्की की, ‘लग्नघटिका समीप’ असताना काका हवेत आणि नकोत, अशी स्पष्ट विभागणी भाजपमध्ये झाली आहे. आता मुंबईत-दिल्लीतले वजनच त्यांच्या कामी येईल.

निर्णय दिल्लीत असला तरी भाजपमध्ये ‘ग्राऊंड झिरो’ला खूप महत्त्व असते. हाच भाजप आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमधला मूलभूत फरक आहे. सध्या भाजपमधील काकाविरोधी गटाने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, माजी शहराध्यक्ष दीपक शिंदे आणि अगदीच शेवटचा पर्याय म्हणून संग्रामसिंह देशमुख यांची नावे चर्चेत आणली आहेत. खासदारांच्या विधानसभा क्षेत्रात उपद्रवाबद्दल स्‍थानिकांची स्पष्ट तक्रार आहे. त्यामुळे आता त्यांना उपद्रवमूल्य शून्य खासदार हवा आहे.

Sangli Loksabha Constituency politics
गोव्याचा मुख्यमंत्री इथं येऊन शिवसेनेच्या जागेवर हक्क गाजवतोय, तुमचं चाललंय काय? रामदास कदमांचं भाजपवर टीकास्र

धूर तरी आहे...!

भाजपकडून पर्यायी नावांच्या प्रारंभीच्या चर्चेत सर्वांत आधी प्रतीक जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा अधिक होती. जयंतरावांनी तशी चाचपणीही केली आहे. मात्र खुद्द जयंतरावांनीच महाआघाडीकडून ‘हातकणंगले’तून प्रतीक चालतील का, अशी चर्चा झाल्याचे सांगत सांगलीतील चर्चेवर पडदा टाकला आहे. राजकारण इतके सैरभैर झाले आहे, की काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा गेली दोन महिने सुरू आहे. खुद्द विशाल यांनी खुलासा करूनही ही चर्चा अद्याप थांबलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com