Sangli News : काळजी नको; एकत्र जाऊ ...! उध्दव यांचा शैलजाभाभींना संदेश

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओळख करून दिली. यावेळी ‘काळजी करू नका, एकत्र जाऊ’, इतकाच संदेश श्री. ठाकरे यांनी दिला.
Uddhav Thackeray and Shailaja Patil
Uddhav Thackeray and Shailaja Patilsakal

सांगली - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसंवाद मेळावा आज मिरजेत होणार आहे. तत्पुर्वी दुपारी चार वाजता त्यांचे सांगलीत आगमन झाले. यावेळी प्रथम त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे दावेदार विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील या उपस्थित होत्या.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओळख करून दिली. यावेळी ‘काळजी करू नका, एकत्र जाऊ’, इतकाच संदेश श्री. ठाकरे यांनी दिला. त्यानंतर ते मिरजेला सभास्थळी गेले. सांगलीतील जागेवरून महाआघाडीतील तिढा कायम असताना उध्दव यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

गेले काही दिवस सांगली कोण लढणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेच महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रचारालाही गती आली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही आव्हान देत आम्हीच लढणार असा नारा दिला आहे. सध्या भाजपला विरोध दूर, जिल्ह्यातील काँग्रेस-सेना नेतेच एकमेकाविरोधात आक्रमक वक्तव्ये देत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आज श्री ठाकरे यांची अचारसंहितेपुर्वीच निश्‍चित झालेली शिवसंवाद यात्रा आज मिरजेत होत आहे. या सभेत श्री ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल महाविकास आघाडीतील घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलेल्या उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसने उघड नाराजी व्यक्त करीत सभेवर बहिष्कार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, श्री. ठाकरे आज वसंतदादांच्या स्‍फृतीस्थळी पोहचले असता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. शिवसेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे यांच्यासह नेत्यांची मोठी गर्दी होती. स्मृतीस्थळावर वसंतदादा यांच्या घराण्याच्यावतीने विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील उपस्थित होत्या. यावेळी माजी नगरसेवक मनोज सरगर यासह काही मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर राऊत यांनी शैलजा पाटील यांची ओळख करून दिली. यावेळी श्री. ठाकरे म्हणाले,‘‘काळजी करू नका, आपण एकत्र जाऊ’ इतकेच बोलले आणि निघून गेले. श्री ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ मात्र कार्यकर्ते लावत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com