मिरजेत आवटी, नायकवडी तरले; खोतांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत नेहमीच चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी सुरेश आवटी यांच्या चिरंजीव संदीप; माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे कुपवाचे नेते धनपाल खोत यांना पराभवाचा धक्का बसला असून कॉंग्रसचे मिरजेचे नेते किशोर जामदार अडचणीत आले आहेत. 

मिरज शहरात भाजपची कामगिरी कशी राहते, याकडे विशेष लक्ष लागले होते. तेथे भाजपची चांगली कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल केली असली तरी अपेक्षित यशापासून अद्याप मोठे अंतर आहे. तेथे सुरेश आवटी यांचे चिरंजीव संदीप यांनी प्रभाग तीनमधून बाजी मारली आहे. तेथे भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपने प्रभाग सातमध्येही पॅनेल विजयी करण्यात यश मिळाले असून कॉंग्रेसला तेथे मोठा धक्का बसला आहे. मिरज शहराचे कॉंग्रेसचे नेते किशोर जामदार यांना धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपच्या गणेश माळी यांनी त्यांना पराभूत केले. याच प्रभागात सध्याचे स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. तेथे भाजपच्या आनंदा देवमाने यांनी विजय मिळवला आहे. 

इकडे कुपवाडचे राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत यांना पराभव पचवावा लागला आहे. तेथे राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे पॅनेलचे अन्य तीन उमेदवार विजयी झाले, मात्र उपमहापौर विजय घाडगे यांनी खोतांना ओव्हरटेक करून धक्का दिला आहे. या विजयामागे कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांचा हात असल्याचे सांगितले जाते. 

Web Title: Sangli Municipal Corporation election results live