आज माघारीचा अखेरचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

सांगली - महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या रणांगणातील भिडूंचे चित्र आज (ता. १७) स्पष्ट होत आहे. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. सांगली, मिरज कुपवाडमधून ३९ जणांनी आज माघार घेतली. २ दिवसांत ६७ जणांनी माघार घेतली. बहुतेकांनी डमी अर्ज मागे घेतले आहे. सर्व प्रमुख पक्षाच्या उमेदवार निश्‍चित झाले असले तरी पावसामुळे प्रचारावर पाणी पडले आहे. 

बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या पक्षांपुढे बंडखोरांचे आव्हान आहे. सांगलीत स्वतंत्रपणे अपक्षांची महाआघाडी स्थापन झाली आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोरांचा भरणा आहे. आता या आघाडीचा दम कडेपर्यंत टिकतो का याचा फैसला उद्या होईल.

Web Title: Sangli Municipal Corporation of the fifth Five-Year Election Today the last day to withdraw