

Candidates and party leaders take out bike rallies and padayatras on the final day
sakal
सांगली : प्रभागांत पदयात्रा व मोटारसायकल फेऱ्यांद्वारे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी आज महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता केली. जागोजागी निघालेल्या फेऱ्यांना नेत्यांनी हजेरी लावली. कोणी दुचाकीवर स्वार होत, कोणी ओपन जीपमध्ये, तर कोणी दुचाकीवर उभे राहून घोषणा देत प्रचारात रंगत आणली.