भाऊजी खून प्रकरणी दोघा मेहुण्यांना विजापूरमधून अटक 

भाऊजी खून प्रकरणी दोघा मेहुण्यांना विजापूरमधून अटक 

सांगली - शहरातील मध्यवस्तीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशीदजवळ दोघा मेहुण्यांनी भाऊजी जमीर रफिक पठाण यांचा खून केला. याप्रकरणी दोघा मेहुण्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विजापूर येथून अटक केली.

मेहुणे आलीम सलिम पठाण (वय 30) व शाहरुख सलिम पठाण (वय 27, रा. अलअमीन शाळेजवळ) अशी त्या दोघांची नावे आहेत. घरगुती कारणातूनच खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

अधिक माहिती अशी, की जमीर यांचा पेन पनवेल येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. पंधरा दिवसांपूर्वी ते लग्नासाठी सांगलीत आले होते. संशयित आलिम व शाहरुख याच्या घराशेजारीच ते रहात होते. आलिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मिरजेतील कॅरम क्‍लबमध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याला अटकही झाली होती. तो कारागृहात असताना त्याच्या मुलाचा सांभाळ बहिणींनी केला होता.

या खुनातून तो निर्दोष सुटला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचा मुलगा आलीमजवळ जात नव्हता. तो त्याच्या बहिणीकडेच रहात होता. याचा त्याला राग होता. मुलगा आपल्याकडे का येत नाही यातून त्याचे बहिणीशी यापूर्वीही वाद घातला होता. काल मध्यारात्री रात्री एकच्या सुमारास याच कारणावरून त्याचा जमीर यांच्याशी वाद झाला. त्या वादातूनच चाकू भोकसून खून करण्यात आला. त्यानंतर दोघेही पसार झाले होते. 

एलसीबीच्या पथकाने तातडीने तपासाची सुत्रे हलवाली. निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यानेतृत्वाखील पथक तयार करण्यात आले. ,  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com