सांगली : आघाडीच्या कोमल बनसोडे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली : आघाडीच्या कोमल बनसोडे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

सांगली : आघाडीच्या कोमल बनसोडे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : प्रभाग ३, ५ व १४ या राखीव दलित प्रभागांमध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना' असे नामफलक लावण्यात यावेत, या मागणीसाठी नगरसेविका कोमल बनसोडे यांनी आज लाक्षणिक उपोषण केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी विकास आघाडीच्या बनसोडे यांचे समर्थन करत पूर्ण पाठिंबा जाहीर केला. मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी येत्या पाच दिवसात फलक लावून घेण्याचे आश्वासन बनसोडे याना आज दिले.

कोमल बनसोडे या विकास आघाडीच्या नगरसेविका आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक ३, ५ व १४ मध्ये सुमारे साडे आठ कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. या सर्व कामांच्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना असे नामफलक लावण्याची वारंवार मागणी करूनही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोमल बनसोडे यांनी हे उपोषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनीही भेटी देऊन पाठिंबा दिला.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

विकास आघाडीच्या नगरसेविका कोमल बनसोडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यावरून भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे नगरपालिकेतील गटनेते संजय कोरे म्हणाले, "नगरसेविका कोमल बनसोडे यांची मागणी रास्त आहे. अण्णाभाऊ दलित वस्ती सुधार योजनेमधून जो निधी मिळाला आहे किंवा त्यातून जी कामे झाली आहेत, त्याचे फलक लागणे आवश्यक होते. ज्या महामानवाच्या नावाने हा निधी मिळाला आहे, त्यांचे नाव वापरण्याला कोणताच आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यामुळे बनसोडे यांच्या मागणीला आमचे समर्थन आहे."

एकाच प्रभागात एकत्र निवडून आलेले विक्रम पाटील व बनसोडे यांच्यात अलीकडे शीतयुद्ध सुरू आहे. तरीही पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मात्र प्रतिक्रिया देताना बनसोडे यांनी त्यांची भेट अपेक्षित नव्हती. त्यापेक्षा आधीपासूनच सहकार्याची भूमिका घेतली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया सकाळला दिली.

loading image
go to top