esakal | विकासासाठी झटून कामाला लागा ; शरद पवार यांचा सांगलीच्या महापौरांना सल्ला

बोलून बातमी शोधा

sangli new mayor suryavanshi visit to sharad pawar in baramati}

महापौरांनी आज बारामतीत गोविंदबाग येथे पवार यांची भेट घेतली.

विकासासाठी झटून कामाला लागा ; शरद पवार यांचा सांगलीच्या महापौरांना सल्ला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : शहर विकासाकडे लक्ष द्या... झटून कामाला लागा असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नुतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज दिला. महापौरांनी आज बारामतीत गोविंदबाग येथे पवार यांची भेट घेतली. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे राहुल पवार, अल्पसंख्याक सेलचे आयुब बारगीर उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पवार यांनी सार्वजनिक भेटीगाठीवर निर्बंध आणले आहेत. सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. सध्या ते गोविंदबागमध्ये थांबून आहेत. सांगली महापालिकेतील विजयानंतर सूर्यवंशी यांनी पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आज सकाळी बारामती गाठली. यावेळी पवार यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. शहराच्या विविध विकास कामांबद्दल माहिती जाणून घेतली. तुमचे नियोजन काय अशी विचारणा केली. शेवटी झटून काम करा असा सल्ला दिला. 

हेही वाचा - आटपाडीत उभारतेय अद्ययावत वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र -

सांगली महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीने थेट महापौरपदावर उडी घेत भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला होता. 39 विरुध्द 36 मतांनीच या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजपचे उमेदवार गजानन मगदुम यांचा पराभव केला आहे. दोन्ही कॉंग्रेसने एकत्र येत पुर्ण बहुमत असलेल्या भाजपचा पराभव करीत महापौर-उपमहापौरपद खेचून आणली आहेत. 

संपादन - स्नेहल कदम