कर्जमाफीसाठी १ लाख ३७ हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

१५ सप्टेंबरची डेडलाईन - सोसायट्यांना १०० बायोमेट्रिक यंत्र 
सांगली - राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी यासाठी प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ३७ हजारांवर आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून ग्रामीण भागातील सोसायट्यांना १०० बायोमेट्रिक यंत्र दिल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. शेतकरी कर्जमाफीसाठीची यंत्रणा संथ गतीने सुरू आहे. पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाहीत, याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, नियमित कर्जदारांना अनुदान योजना जाहीर करून दोन महिने झाले आहेत. त्यासाठी कर्जमाफीचा अर्ज ऑनलाईन भरावा लागत आहे. अर्ज भरण्याची सोय सेतू केंद्रात करण्यात आली आहे; परंतु ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणी आहेत. पूर्ण क्षमतेने इंटरनेट कनेक्‍शन मिळत नसल्याने नोंदणी गतीने करणे अशक्‍य होत आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे २.५७ लाख शेतकरी पात्र आहेत. अनेक शेतकऱ्यांची आधार कार्ड जोडली जात नाहीत. या कारणांनी अर्ज नोंदणीस वेळ लागतो. 

जिल्ह्यात १.२० लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहेत. १.३७ लाख  शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत आहे. जिल्हा बॅंकेच्या २१८ शाखांपैकी १०० शाखांत बायोमेट्रिक यंत्र दिली आहेत. जिल्हा बॅंकेच्यावतीने कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी शंभर बायोमेट्रिक यंत्र पुरवण्यात आली आहेत.

Web Title: sangli news 1.37 lakh form for loan waiver