आयुर्वेद, होमिओपॅथीच्या 1647 जागा रिक्त 

आयुर्वेद, होमिओपॅथीच्या 1647 जागा रिक्त 

सांगली - राज्यातील आयुर्वेद व होमिओपॅथीक महाविद्यालयातील शासकीय कोट्यातील प्रवेश 26 ऑक्‍टोबर 2017 रोजी संपलेल्या तेराव्या फेरीअखेरही पूर्ण क्षमतेने प्रवेश होऊ शकले नाहीत. एक हजार 647 जागा रिक्त आहेत. त्यात आयुर्वेदच्या 284 आणि होमिओपॅथीच्या 1363 जागांचा समावेश आहे. होमिओपॅथिक व्यवस्थापन कोट्यातील किमान 30 टक्के जागाही रिक्त आहेत.

संस्थापातळीवर रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवायला परवानगी नसल्यामुळे संस्थाचालक हवालदिल आहेत. विशेष म्हणजे शासकीय कोट्यातील जागाही रिक्त असल्याने आर्थिक गणित बसवण्याचे मोठे आव्हान संस्थांसमोर आहे. 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) तर्फे राज्यातील प्रवेश प्रक्रिया होते. आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या केंद्रीय पद्धतीने प्रवेशासाठीच्या समुपदेशन फेऱ्या मुंबईत आर. डी. पोतदार आयुर्वेद महाविद्यालयात सुरू आहेत. बारावी व नीटचा निकाल लागून पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रवेश सुरूच आहेत. यंदा प्रथमच नीटवर आधारित प्रक्रिया आहे. होमिओपॅथी प्रवेशाबाबत पात्र विद्यार्थी आहेत; मात्र त्यांची नोंदणी नसल्याने ते शासकीय कोट्यातील जागांपासून वंचित आहेत.

नीट परीक्षा दिलेले मात्र नोंदणी न केलेले विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी पात्र आहेत. मात्र त्यांना राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती, ईबीसी सवलतींचा लाभ मिळत नाही. यामुळे विद्यार्थी, पालकांनी व्यवस्थापन कोट्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी होमिओपॅथीक व्यवस्थापन कोट्यातील 250 ते 300 जागा रिक्तची भीती आहे. आयुर्वेद, होमिओपॅथीसाठी 31 ऑक्‍टोबर प्रवेशासाठीचा अंतिम दिवस आहे. त्यादिवशीही जागा रिक्त राहतील. शासकीय कोट्यातील जागा महाविद्यालय पातळीवर भरायला परवानगी देण्याची गरज आहे. यापूर्वी ती प्रत्येक वर्षी मिळत होती. यंदाच त्यामध्ये अडचण आली आहे. 

रिक्त जागा अशा 
आयुर्वेद ः मेहता महाविद्यालय (मुंबई, हिंदी माध्यम)- 25. साई बार्शी 10, संगमनेर- 14, एम. एस. गोंदिया-20, एमयुपीएस देहगाव-24, एएसपीएम बुलढाणा- 17, मुळीक नागपूर- 10, रामराव पाटील परभणी-14, आदित्य बीड- 18, शांतिदेवी हिंगोली- 11, वेदप्रकाश जालना-15. 
होमिओपॅथी ः विराज-10, साई भाईवाडी-25, चंद्रकांत कळुस्कर अलिबाग-25, वेगुर्ला- 26, दापोली-27, चिंचवड 48, जे. जे. मगदूम जयसिंगपूर- 29, एसजेपीई कोल्हापूर-17, गडकरी, गडहिंग्लज- 28, सातारा-21, गुलाबराव पाटील, मिरज- 28, नगर होमिओपॅथीक -32, एमएचएफ संगमनेर- 52, काकासाहेब मस्के नगर- 33, मोमिन नाशिक (62, गुजराती अल्पभाषिक), केबीए चंदवाड 15, केडीएमजी धुळे- 64, संगमनेर होमिओपॅथीक- 48, अण्णासाहेब होमिओपॅथीक- 2, पीएसपीएम सोलापूर-16, उल्हास पाटील जळगाव- 15, शरदचंद्रजी पवार नगर- 45, सांगली आर. आर. पाटील-37, जामखेड (नगर)- 82, अंत्राराबाई नागपूर-23, पुरुषोत्तम चंद्रपूर- 26, पंचशील खामगाव- 27, होमिओपॅथीक गोंदिया- 42, पीजेएन अमरावती- 59, श्रीवल्लभ अमरावती- 19, अकोला होमिओपॅथीक- 50 पैकी 42 रिक्त, औरंगाबाद (अल्पसंख्याक जैन)- 35, नांदेड होमिओपॅथीक 28 रिक्त. 

प्रवेशावर एक दृष्टिक्षेप... 
0 आयुर्वेद- 
शासकीय- 20, प्रवेश क्षमता- 1190, रिक्त जागा- 63 
खासगी- 49, प्रवेश क्षमता- 3110, रिक्त जागा -221 

होमिओपॅथी- 
0 खासगी महाविद्यालय-49, प्रवेश क्षमता-3460, रिक्त जागा-1363 
0 नव्याने मंजूर सहा होमिओपॅथीक कॉलेजमध्ये जागा रिक्त 
0 होमिओपॅथीक जागा प्रवेशावर उच्च न्यायालयात 1 नोव्हेंबरला सुनावणी 

नोंदणी नसलेल्यांना प्रवेश... 
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना माझ्यासह होमिओपॅथीच्या प्रवेशाबाबत संस्थाचालक केंद्रीय संघटनेचे जयदेव क्षीरसागर यांनी 24 ऑक्‍टोबरला मंत्रालयात भेटलो. त्यांच्याकडे रिक्त जागा संस्थापातळीवर भरायला परवानगी मागितली आहे. होमिओपॅथीसाठी नोंदणी न केलेल्यांना संस्थाकोट्यातून प्रवेश मिळतोय. 
- पृथ्वीराज पाटील,
राज्य सचिव होमिओपॅथीक संघटना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com