#Monsoon चांदोली धरण परिसरात 170 मिलिमीटर पाऊस 

विजय पाटील
मंगळवार, 26 जून 2018

सांगली - सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक विक्रमी पाऊस आहे. 

सांगली - सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक विक्रमी पाऊस आहे.

गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण परिसरासह शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळी आठ ते मगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 170  मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणचे ओढे नाले भरुन वाहू लागले आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दमदार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

गेल्या चोवीस तासात धरणाची पाणीपातळी 0.80  मीटरने वाढली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 602.45 मीटर असून पाणीसाठा 14.42 टीएमसी इतका आहे. धरण 41.90  टक्के भरले आहे. तर आज अखेर 353 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे.

Web Title: Sangli News 170 MM rains in Chandoli