सांगली जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सांगली - जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय काल आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १५ निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांच्या विनंतीवरून आणि प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली. अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काल सायंकाळी बदल्यांचा आदेश जारी केला.

सांगली - जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय काल आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १५ निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांच्या विनंतीवरून आणि प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली. अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काल सायंकाळी बदल्यांचा आदेश जारी केला.

सांगली शहरचे निरीक्षक अनिल गुजर यांची जिल्हा  विशेष शाखेत बदली करण्यात आली. अन्य बदल्यांमध्ये राजेंद्र मोरे (मिरज ग्रामीण ते पोलिस कल्याण), अशोक भवड (कुपवाड एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष), एम. बी. पाटील (तासगाव ते कडेगाव), सिराज इनामदार (कवठेमहांकाळ ते नियंत्रण कक्ष), आर. ए. ताशिलदार (नियंत्रण कक्ष ते जत), आर. डी. शेळके (नियंत्रण कक्ष ते सांगली शहर), एस. एम. गिड्डे (नियंत्रण कक्ष ते  सुरक्षा शाखा), रमेश भिंगारदेवे (नियंत्रण कक्ष ते संजयनगर), प्रकाश गायकवाड (सांगली ग्रामीण ते कवठेमहांकाळ), मोहन जाधव (विटा ते मिरज ग्रामीण), के. एस. पुजारी (आटपाडी ते सायबर सेल), अशोक कदम (सायबर सेल ते कुपवाड एमआयडीसी), रवींद्र डोंगरे (आर्थिक गुन्हे शाखा ते सांगली ग्रामीण), युवराज मोहिते (जत ते नियंत्रण कक्ष) यांची बदली करण्यात आली.

जिल्ह्यातील १५ सहायक निरीक्षकांची देखील बदली करण्यात आली. त्यानुसार के. बी. कमते (नियंत्रण कक्ष ते सांगली ग्रामीण), डी. बी. ठाकूर (नियंत्रण कक्ष ते मिरज ग्रामीण), व्ही. बी. पाटील (नियंत्रण कक्ष ते कवठेमहांकाळ), एस. जी. डोके (नियंत्रण कक्ष ते गुंडाविरोधी पथक प्रभारी अधिकारी), एन. ए. माने (नियंत्रण कक्ष ते विटा), सरोजिनी पाटील (विश्रामबाग ते पलूस प्रभारी अधिकारी), एस. बी. बोंदर (नियंत्रण कक्ष ते संजयनगर), एस. ए. हारूगडे (कुरळप ते सांगली शहर), डी. बी. पिसाळ (तासगाव ते विटा), ए. व्ही. शिंदे (पलूस ते नियंत्रण कक्ष), एन. पी. मोरे (कासेगाव ते कुरळप), ए. व्ही. चव्हाण (विटा ते इस्लामपूर), यु. एम. दंडिले (कडेगाव ते तासगाव),  पवन चौधरी (सांगली शहर ते कासेगाव), संगीता माने (महात्मा गांधी चौक ते विश्रामबाग) यांची बदली करण्यात आली.

Web Title: sangli news 30 police officer transfer