अभियानात नव्याने ३३ हजार २२४ दिव्यांग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

सांगली - दिव्यांग मित्र अभियानात ३० हजार २२४ जणांची नोंदणी झाली. सर्व जणांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक म्हणजे १४ हजार ४१९ जण अस्थिव्यंग असलेले अपंग आहेत. उद्या (ता. ३१) दुपारी बारापर्यंत नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑगस्टमध्ये पुढील दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. 

राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग लाभार्थी नोंदणीत ३० हजार २२४ नोंदणी झाली. अभियान चार टप्प्यात राबवले जाणार आहे. लाभार्थीच्या अर्जांची ऑनलाईन नोंदणीही पूर्ण झाली. अंध, कर्णबधिर,  गतिमंद, मूकबधिर, मतिमंद, बहुविकलांग, अस्थिव्यंग इतर बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन नोंदणी  केलेल्यांत अंध - ४२२७, कर्णबधिर - ३२२६, गतिमंद - ९९९, मूकबधिर - २१०६, मतिमंद - ४५५९, बहुविकलांग - २०७०, अस्थिव्यंग - १४४१९, इतर - १६१७. ३३ हजार २२४. नोंदणी व लाभार्थी ः आटपाडी- २१६३, जत - ४६२१, खानापूर-विटा- २२३८, कडेगाव - २९२८, तासगाव - ४३८४, कवठेमहांकाळ - २७१९,  पलूस - १६६७, वाळवा - ५१२४, शिराळा - २२९५, मिरज - ५०८५. 

Web Title: sangli news 33,224 handicaped in sangli municipal campaign registration