मिरज-पंढरपूर रस्त्यावर दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

संतोष भिसे
बुधवार, 31 जानेवारी 2018

मिरज - मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी झाले. जखमीमध्ये सोलापूरच्या दोन सख्या भावांचा समावेश आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

मिरज - मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी झाले. जखमीमध्ये सोलापूरच्या दोन सख्या भावांचा समावेश आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- सोलापूरकडून सिमेंटची पोती भरुन मिरजेच्या दिशेने येणारा ट्रक व मिरजेतून पंढरपुरच्या दिशेने जाणारा ट्रक यांची वळणावर समोरासमोर धडक झाली. यामुळे ट्रकमधील सिमेंटची पोती रस्त्यावर विखुरली. अपघातामधील एका ट्रकचा क्रमांक एमएच 13 क्यु 2672 असा क्रमांक आहे.  जखमींपैकी  दोघेजण सख्खे भाऊ असून ते सोलापूरचे रहिवासी आहेत. तीनही जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. मिरज ग्रामिण पोलिसांनी पंचनामा केला, वाहतुक सुरळीत केली. घटनेत अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले. 

Web Title: Sangli News accident on Miraj Pandharpur road three injured