कारखान्यांकडून साखरेवरच डल्ला - अनिल घनवट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

सांगली - अनेक साखर कारखाने साखर विक्रीचा दरात घोटाळा करून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. कारखानदारच साखरेवर डल्ला मारत असल्याने उसाला चांगला दर मिळेना झालाय, असा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

सांगली - अनेक साखर कारखाने साखर विक्रीचा दरात घोटाळा करून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. कारखानदारच साखरेवर डल्ला मारत असल्याने उसाला चांगला दर मिळेना झालाय, असा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

संघटनेची ऊस परिषद बुधवारी (ता. 8) दुपारी 2 वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. त्यामध्ये गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे उसाच्या दरासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले,""उसाच्या पहिल्या उचलीची मागणी आणि घोषणेपेक्षा लपवून ठेवले जाणारे अर्थकारण नीट समजून घेतले पाहिजे. आम्ही ते ओरडून सांगतोय. शेतकऱ्याला योग्य भाव मिळवून देण्याची आमची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. कारण, आमच्यामागे फार गर्दी दिसत नसली तर मुद्दे वास्तवाला धरून आहेत. गणदेवी साखर कारखाना 4500 रुपयांपेक्षा अधिक दर देत असताना आपण 3 हजार रुपयांवरच अजून अडलेलो आहोत. तेथील अन्य कारखानेही अधिक दर देताहेत, कारण त्यांचे हिशेब चोख आहेत. आपल्याकडे साखर कारखानदारांनीच साखरेवर डल्ला मारण्याचे धोरण ठेवले आहे. प्रत्यक्ष साखर विक्रीचा दर आणि कागदावरील दर यात तफावत आहे.'' 

ते म्हणाले,""या साऱ्या प्रश्‍नांवर चर्चा करून लांबपल्ल्याच्या लढाईसाठी ऊस परिषद होत आहे. त्यात पुढील दिशा ठरेल. शेतकऱ्यांना गुजरातमधील दर अवाक्‌ करणारा असला तरी तो वास्तववादी आहे. त्यासाठी आम्ही लढत राहणार आहोत. शेतकऱ्यांना त्याला साथ द्यावी.''

सहकार आघाडीचे राज्य प्रमुख संजय कोले, साखर उद्योगाचे अभ्यासक अजित नरदे, महिला आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सीमाताई नरोडे, अभिमन्यू शेलार, शीतल राजोबा, मुसा देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Sangli News Anil Ghanvat Press