आटपाडीतील कृषी सहाय्यक कामावर कमी बाहेरगावीच जास्त

नागेश गायकवाड
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

आटपाडी  - सातारा जिल्ह्यातील आमदार नेत्याचा कार्यकर्ता येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून अडीच वषेॅ वरिष्ठांच्या कृपेने कागदोपत्री कामावर आहे. प्रत्यक्षात तो कामावर कमी व गावीच जास्त असतो. मात्र वरिष्ठाच्या कृपेने नियमित वेतन घेतो.

आटपाडी  - सातारा जिल्ह्यातील आमदार नेत्याचा कार्यकर्ता येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून अडीच वषेॅ वरिष्ठांच्या कृपेने कागदोपत्री कामावर आहे. प्रत्यक्षात तो कामावर कमी व गावीच जास्त असतो. मात्र वरिष्ठाच्या कृपेने नियमित वेतन घेतो. शासनाची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणाची चौकशी करून बडतर्फ करावे आणि पाठीशी घालणाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर मागणी आहे.   

ही फसवणूक अडीच वषेॅ सूरू आहे. इतर कर्मचारी खासगीत याला दुजोरा देतात, पण वरिष्ठांच्या दबावापुढे त्यांचे काही चालत नाही. संबंधित कृषी सहाय्यक सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा आहे. आमदार नेत्याचा कार्यकर्ता म्हणून तो वावरतो. त्याची पत्नीही तेथे नगरसेविका आहे. तिचे काम हाच बघतो.

येथे कागदावर हजेरी दाखवून कृषी सहाय्यक अडीच वषेॅ पगार घेत आहे. ही शासनाची फसवणूक असून या गंभीर प्रकारणाची चौकशीची मागणी करणार आहे.

- ब्रम्हदेव पडळकर, समाज कल्याण सभापती

अडीच वर्षापूर्वी ते आटपाडीत हजर झाले. त्यावेळी त्यांच्या नेतेगिरीमुळे त्यांना हजर करून घेण्यास विरोध केला होता. मात्र नेत्याने वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला. त्याला आटपाडीला पाठवले. संबंधित कृषी सहाय्यक महिन्यातून दोन-चार वेळा हजेरी लावतो आणि सह्या करून गावी जातो. त्याचे काम अधिकारी इतराकडून करून घेतात, हा प्रकार समाज कल्याण सभापती पडळकर यांनी उघडकीस आणला. शेतकऱ्यांच्यासोबत ते कार्यालयात गेल्यांनतर त्याच्या लक्षात हा प्रकार आला. या प्रकाराची चौकशी करून संबंधित कृषी सहाय्यकाला बडतर्फ करावे आणि पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित करावे, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.             

 

Web Title: Sangli News assistant Agriculture officer work issue