आटपाडीच्या बोकडाला मोठी मागणी; बाजारात सव्वा कोटींची उलाढाल

नागेश गायकवाड
गुरुवार, 10 मे 2018

आटपाडी  - झणझणीत मटणाचा रस्याचे नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. त्यात आटपाडीच्या बोकडाचे मटण म्हणजे खवय्यांची पर्वणीच. त्याचा डंका चोहीकडेच गेला आहे. त्यामुळेच आटपाडीच्या शेळ्या - मेंढ्या आणि बोकडाला गोवा आणि कर्नाटकातून प्रचंड मागणी आहे. येथील आठवडा बाजारात तब्बल सव्वा कोटीवर उलाढाल होते.

आटपाडीत दर शनिवारी प्रचंड मोठ्या ओढा पात्रात शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचा बाजार गेली चाळीस वषेॅ भरतो. चवदार मटण आणि मुबलक माल यामुळे आटपाडीचा बाजार प्रसिध्द झाला आहे. आठवडी बाजारात किमान पाच ते सात हजाराची आवक होते. तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर जोडधंदा म्हणून घरगुती शेळीपालन मोठ्या प्रमाणात करतात, तर मेंढपाळाचे कळपच्या कळप आहेत.

या व्यवसायाने उदरनिर्वाहासाठी हातभार लावला आहे. शिवाय बंदिस्त शेळीपालनचे ही फार्म उभे राहू लागलेत. खरेदीसाठी गोवा, कर्नाटक, कोल्हापुर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग येथून खाटीक व्यापारी  50 ते 70 पिकप गाड्या घेऊन येतात. संगोपन आणि पैदाशीसाठीही शेळ्या येथून घेतल्या जातात. वांझ शेळ्या हैदराबादकडे पाठवतात. मेंढ्या कोल्हापूरकडे तर, बोकड कर्नाटक, गोवा, सांगलीकडे पाठवतात.  

दृष्टिक्षेप  

  • आवक - 5000 ते 7000
  • विक्री - 2500 ते 3000
  • उलाढाल - सव्वा कोटी.          

बाजारात पाच ते सात हजार शेळ्या-मेंढ्यांची आवक होत असून सव्वा कोटीची उलाढाल होते. त्यातून तालुक्यात बाहेरून चलन येते.

- शशिकांत जाधव, सचिव आटपाडी बाजार समिती                 

Web Title: Sangli News Atapadi Weekly Market special