आटपाडीत माल वाहतुकदारांचा संप

नागेश गायकवाड
गुरुवार, 28 जून 2018

आटपाडी - भरमसाठ डिझेल दरवाढीमुळे येथील मालवाहतूक वाहन चालकांनी आज वाहतूक बंद ठेवली होती. याला मोठा प्रतिसाद मिळाला. एक जुलैपासून वीस टक्के दरवाढ करण्याचा एकमताने संघटनेने निर्णय जाहीर केला. 

आटपाडी - भरमसाठ डिझेल दरवाढीमुळे येथील मालवाहतूक वाहन चालकांनी  आज वाहतूक बंद ठेवली होती. याला मोठा प्रतिसाद मिळाला. एक जुलैपासून वीस टक्के दरवाढ करण्याचा एकमताने संघटनेने निर्णय जाहीर केला. 

येथील मालवाहतूक संघटनेने आज एक दिवस वाहतूक पूर्ण बंद ठेवून संप केला. यात सर्व मालवाहतुकीची वाहने टमटम, पिकअप, कंटेनर आदी वाहन चालक मालक सहभागी झाले होते. यापूर्वी 2014 मध्ये वाहतूकदरात वाढ केली होती. गेली तीन वर्षात डिझेलच्या दरात 25 रुपये वाढ झाल्यामुळे वाहतूकदारांना परवडत नव्हते. त्यामुळे सर्व वाहतूकदारांनी एकत्र येऊन एक दिवस वाहतूक बंद ठेवली. दिवसभर सर्व वाहने ओढा पात्रात लावली होती. सायंकाळी वाहतूकदारांनी एकत्र येऊन चर्चा केली. यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.

डिझेल दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे मालवाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक दिवस वाहतूक बंद ठेवली आणि 20 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला.

- आकाराम पाटील,

अध्यक्ष, मालवाहतूक संघटना, आटपाडी

Web Title: Sangli News Atpadi Goods transport strick