तुंगमध्ये मासेमारी करणाऱ्यावर मगरीचा हल्ला

विजय पाटील
सोमवार, 28 मे 2018

सांगली - ब्राह्मणाळ येथील मगरीने मुलाला ओढून नेल्याच्या घटनेला महिना होत नाही  तर आज तुंगमध्ये कृष्णा पात्रात मगरीने एका मासेमारी करणाऱ्यावर हल्ला केला आहे. सुदैवाने या हल्ल्यातून त्या व्यक्तीने शिताफीने आपली सुटका करून घेतली. पुन्हा एकदा कृष्णा काठावर मगरीने हल्ला करण्याची घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी महादेव तुकाराम मोरे हे तुंग नदी काठावर मासेमारी करीत होते. यावेळी अचानक नदीपात्रातून आलेल्या मगरीने मोरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मोरे यांचा पाय मगरीने तोंडात पकडला . यावेळी झालेल्या झटापटीत मोरे यांनी प्रतिकार करून मगरीच्या जबड्यातून आपला पाय काढून तेथून पळ काढल्याने मोरे बचावले. घटनेनंतर मोरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या हल्ल्यात मगरीने मोरे यांच्या पायाचा चावा घेतला असून पाच दाते मोरे यांच्या पायात घुसली आहेत. या घटनेनंतर मच्छीमारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा एकदा मगरीनी आपली दहशत निर्माण केली आहे.

Web Title: Sangli News attack of crocodile in Tung