सांगलीत पोलीस मुख्यालयात तीन महिलांचा आत्महदहनाचा प्रयत्न

बलराज पवार
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सांगली - पोलीस तक्रार घेत नसल्याने मिरजेतील तीन महिलांनी आज सकाळी पोलीस मुख्यालयात पेटवून घेऊन आत्महदहनाचा प्रयत्न केला. यावेळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करताना महिला पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने मुख्यालयात खळबळ उडाली. 

सांगली - पोलीस तक्रार घेत नसल्याने मिरजेतील तीन महिलांनी आज सकाळी पोलीस मुख्यालयात पेटवून घेऊन आत्महदहनाचा प्रयत्न केला. यावेळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करताना महिला पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने मुख्यालयात खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, मिरजेच्या ख्वाजा नगरात राहणाऱ्या या महिलांच्या घराशेजारी असणाऱ्या एका कुटुंबाकडून वारंवार त्रास होत आहे. याबाबत महात्मा गांधी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज सकाळी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस मुख्यालयाच्या दारात  अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

तीन महिला तीन लहान मुलांना सोबत घेऊन पोलिस मुख्यालयात आल्या. अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला जाऊन तेथे त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्युटीवर असलेले पोलिस तातडीने तेथे धावत गेले. त्यातील महिला पोलिसांनी झडप घालून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना रोखून त्यांच्याकडील काडेपेटी काढून घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

मुमताज शेख , मीना घटकर आणि हिना शेख अशी या महिलांची नावे आहेत. यावेळी मुमताज शेख या महिलेने सांगितले की, आमच्या घराशेजारी राहणाऱ्या तारा अस्लम देसाई या महिलेची मुलगी तब्बू, मुले सर्फराज आणि शाहरुख यांनी आम्हाला मारहाण केली. घरातील साहित्य फोडले, भांडी फोडली. याबाबत महात्मा गांधी पोलिस चौकीत तक्रार देण्याचा  आम्ही प्रयत्न केला. मात्र पोलिस येवून फक्त फोडलेली भांडी, काचा बघून गेले. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.'' 

Web Title: Sangli News attempt of Suicide in Police Head Quarter