बेडगला ‘लक्ष्या’ने तोडली कर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

आरग - बेडग (ता. मिरज) मध्ये तीनशे वर्षांपासून सुरू असेलेली कर्नाटकी बेंदूरची परंपरा ग्रामस्थांनी वाजत-गाजत साजरी केली. ‘लक्ष्या’ने कर तोडल्यानंतर सौंदडीचे काटे घेऊन ते घरोघरी परतले. ईडा-पीडा टाळणारी सौंदडी घरावर टाकून सुख-शांतीसाठी प्रार्थना केली.

आरग - बेडग (ता. मिरज) मध्ये तीनशे वर्षांपासून सुरू असेलेली कर्नाटकी बेंदूरची परंपरा ग्रामस्थांनी वाजत-गाजत साजरी केली. ‘लक्ष्या’ने कर तोडल्यानंतर सौंदडीचे काटे घेऊन ते घरोघरी परतले. ईडा-पीडा टाळणारी सौंदडी घरावर टाकून सुख-शांतीसाठी प्रार्थना केली.

महाराष्ट्र, कर्नाटकात वेगवेगळ्या दिवशी बेंदूर होतो. बेडगमध्ये कर्नाटकी बेंदूरच्या दोन-तीन दिवस अगोदरच ती होते. ज्येष्ठातील शुक्‍ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर बेंदूर करण्याची परंपरा आहे. काल पाटील घराण्याच्या मानाच्या ‘लक्ष्या’ची मिरवणूक निघाली. सजवलेल्या लक्ष्याने अमरसिंह पाटील यांच्या वाड्यातून दुपारी पाऊल टाकले.

गावभर फिरल्यानंतर सायंकाळी राजवाड्यात आला. चावडीसमोर गाववेशीत लिंबाच्या डहाळ्यांची कर  तोडली. मानकरी तीन कुटुंबांनी लक्ष्याला पाटीलांच्या वाड्यात परत नेण्याची जबाबदारी पेलली. वाड्यात प्रवेशताना धान्याचे मापही ओलांडले. कर तोडणाऱ्या मानाच्या बैलाची विक्री  करत नाहीत.

तो वाड्याबाहेर पडण्यापूर्वीच गावकऱ्यांना आपापल्या मिरवणुका आटोपत्या घ्याव्या लागतात. बेंदुरादिवशी बैलाच्या पायात तुडवली जाणारा सौंदड म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातील काटेरी संकटे समजली जातात. बैलाने ती तुडवल्याने ईडा-पीडा जाते,  अशी श्रद्धा आहे. मिरवणुकीनंतर ग्रामस्थ सौंदड घरावर नेऊन टाकतात.

तीनशे वर्षांपासून घराण्यात मान आहे. काळ बदलला  तरी श्रद्धा कायम आहेत. कुटुंबात सदस्याप्रमाणे लक्ष्याचा सांभाळ करतो. पाटील घराण्यावर संकटे येणार नाहीत याची काळजी तो घेतो, अशी श्रद्धा आहे.
- अमरसिंह पाटील, 

करीच्या बैलाचे मानकरी

Web Title: Sangli News Bendur in Bedag