सांगली जिल्ह्यातील आठ गावात डासच डास - सीईओ अभिजीत राऊत
सांगली - जिल्ह्यात अमरापूर, भिलवडी, नांद्रे, जत, मणेराजुरी, येळावी, अंकलखोप, कसबे डिग्रज या आठ गावांत डासांची घनता जास्त आहे. मेमध्ये कवठेपिरान, मालेवाडी येथे डेंगीचा उद्रेक झाला. बेवनूर, पलूस, शिराळा, उटगी, कवठेपिरान येथे चिकुनगुनियाचा उद्रेक झाला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिना हिवताप जनजागरण मोहीम म्हणून साजरा केला जात आहे.
श्री. राऊत म्हणाले,""हिवताप, डेंग्यू, चिकुनगुणियासाठी प्रतिबंधात्मक उपाय करताना हिवतापाचे रूग्ण अत्यल्प आढळत आहेत. ग्रामीण व शहरी भागात डेंगी व चिकुनगुणियाचे रूग्ण मिळतात. हिवताप थंडी वाजून येणारा ताप प्लासमोडीयम या परोपजिवी जंतूमुळे होतो. त्यांचा प्रसार ऍनाफिलिस डासांमार्फत होतो. घर, परिसरात डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. कायम डास उत्पन्न होणाऱ्या ठिकाणी गप्पीमासे सोडावेत.''
ते म्हणाले,""रूग्णांनी ताप येताच रक्त तपासून घ्यावे. मोफत रक्तनमुना तपासणी उपलब्ध आहे. मानवनिर्मित डासोत्पती ठिकाणे नष्ट करावीत. सायंकाळी दारे, खिडक्या बंद कराव्यात. डासप्रतिबंधक अगरबत्ती, मच्छरदानीचा वापर करावा. एडीस इजिप्टाय डासामुळे डेंगी व चिकुनगुनिया होतो. साचलेल्या पाण्यात त्यांची उत्पत्ती होते. आठवड्यात एक दिवस कोरडा पाळावा. टाक्यांत टेमीफॉस द्रावण टाकावे.''
- डेंगी - मे अखेर 26
- चिकुनगुनिया - 63 रूग्ण
- चिकुनगुनिया - मे अखेर 37ा
- डासांची घनता जास्त - आठ गावे.