सोलापूर एक्‍स्प्रेसच्या वेळेत बदल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मिरज - मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. महिन्यापूर्वी कुर्डुवाडी - सोलापूर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने एक्‍स्प्रेसची गती वाढली आहे. त्यामुळे वेळेत बदलाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. 

मिरज - मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. महिन्यापूर्वी कुर्डुवाडी - सोलापूर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने एक्‍स्प्रेसची गती वाढली आहे. त्यामुळे वेळेत बदलाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. 

सोलापुरातून एक्‍स्प्रेस ( ११३०९ ) सध्या पहाटे सहा वाजता सुटते. नव्या वेळापत्रकानुसार एक तास उशिरा म्हणजे सात वाजून पाच मिनिटांनी सुटेल. कुर्डुवाडीत आठ वाजता येऊन ८.०५ वाजता सुटते; त्याऐवजी ८.१५ वाजता येऊन ८.२० वाजता सुटेल. मिरजेत दुपारी १२.०५ वाजता पोहोचते; त्याऐवजी पंधरा मिनिटे अगोदर म्हणजे ११.५० वाजता येईल.

मिरजेतून सोलापूरसाठी (११३१०) सुटण्याची सध्याची वेळ दुपारी ३.२५ वाजता आहे. त्याऐवजी पस्तीस मिनिटे उशिरा म्हणजे दुपारी चार वाजता निघेल. कुर्डुवाडीत ७.१० वाजता पोहोचून ७.२० वाजता निघते; नव्या वेळापत्रकानुसार तीस मिनिटे उशिरा म्हणजे ७.४० वाजता पोहोचेल व पाच मिनिटे थांबून पुढे निघेल. सोलापुरात पोहोचण्याची सध्याची वेळ रात्री ८.५५ वाजताची आहे; त्याऐवजी पाच मिनिटे अगोदर म्हणजे ८.५० वाजता पोहोचेल. 

दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने एक्‍स्प्रेसची गती वाढली आहे. तिची पूर्वीची सरासरी गती ४५ ते ५० किलोमीटर होती; दुहेरीकरणानंतर ५५ किलोमीटर प्रतितास झाली. मिरज-सोलापूर प्रवासासाठी चाळीस मिनिटांची वेळेची बचत झाली. तर सोलापूर-मिरज प्रवासासाठी तब्बल ऐंशी मिनिटांची वेळ कमी झाली. यापूर्वी पाच तास पन्नास मिनिटे वेळ घेणारी ही एक्‍स्प्रेस आता चार तास ४५ मिनिटे घेणार आहे. नवा बदल आठवड्याभरात लागू होईल; निश्‍चित दिवस प्रवाशांना कळवला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Sangli News change in time of Solapur Express