आवंढी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचा श्रमदानात सहभाग

अभिजित डाके
शुक्रवार, 18 मे 2018

आवंढी, (जि. सांगली ) - राज्यातील दुष्काळ केवळ  मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्वाची ठरणार आहेत, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासन आणि पाणी फाउंडेशची कामे सुरू आहेत. ती महत्वाची ठरणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आवंढी, (जि. सांगली ) - राज्यातील दुष्काळ केवळ  मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्वाची ठरणार आहेत, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासन आणि पाणी फाउंडेशची कामे सुरू आहेत. ती महत्वाची ठरणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आवंढी (ता.जत) येथे जलसंधारण आणि पाणी फाउंडेशनच्या कामांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (18) ते येथे आले होते. यावेळी त्यांनी येथे श्रमदानही केले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.

मी आज याठिकाणी प्राथमिक स्वरूपात श्रमदान केले आहे ते काही कामाचे नाही. पण तुमच्या बरोबर श्रमदान केल्याचा मला अभिमान आहे

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यासोबत श्रमदान केले. ग्रामस्थ महिला यांच्याशी संवादही साधला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आवंढी गावातील दुष्काळ हटवण्यासाठी ग्रामस्थ याची एकजुटी अभिनंदनास पात्र आहे.  पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आज संपूर्ण गाव जात, पात, गट-तट विसरून एकत्र आले आहे. खऱ्या अर्थाने गावातच पाण्याची पार्टी बनली आहे. असे मत व्यक्त करत गाव जर मैदानात उतरलं तर दुष्काळ पराजित होऊ शकतो. हे गावातील जनतेने दाखवून दिले आहे. तसेच आज पाण्याविना काही नाही पाणी आली की समृद्धी येते. त्यामुळे पाण्यासाठी गावाचे सुरु असलेले काम कौतुकास्पद आहे, असे मुख्यमत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या 50 वर्षात कोणतीही योजना तळागाळा पर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यांनी एकमेकाला अडवले आणि जिरवले अशी टीका केली. राज्यातील 50  टक्के गावे दुष्काळाशी सामना करत आहेत. केवळ धरणावर हा दुष्काळ संपणार नाही. त्यासाठी जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत. राज्यातील आज मितीस 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. अजून 6 हजार गावे यावर्षी दुष्काळ मुक्त होतील. आम्ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. पावसाचा प्रत्येक थेंब माझ्या मालकीचा आहे आणि तो माझ्या गावातील जमिनीत मुरला पाहिजे. पाणी फाउंडेशनचे अमीर खान, पोपटराव पवार, डॉ अविनाश पोळ याचे नेहमीच सल्ला घेऊन पाणी फाउंडेशन आणि जलसंधारण ची कामे केली जात आहेत. राज्यातील दुष्काळ मुक्त करण्यासाठी गावातील गट तट विसरून एकत्र आले पाहिजे तरच राज्य दुष्काळ मुक्त होईल.

Web Title: Sangli News Chief Minister Phadavis Visit Pani foundation work