कोथिंबीरचा "तोरा' उतरला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सांगली - पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे भाजीपाल्याची आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे दरात तेजी कायम आहे. कोथिंबीर पेंढीचा दर मात्र 25 रुपयांवरून थेट 5 रुपयांवर आल्याने "तोरा' कमी झाला, हीच ग्राहकांसाठी समाधानाची बाब आहे. मेथी, पालक, चाकवत 7 रुपयांना पेंढी झाल्याने त्यावर ग्राहकांनी उड्या घेतल्या आहेत. 

टोमॅटोचा गेल्या आठवड्यात वाढलेला दर 60 रुपयांवर कायम आहे. वांगी 50 ते 60 रुपये, भेंडी 40 ते 50 रुपये, कोबी 25 ते 30 रुपये, फ्लॉवर 40 ते 50 रुपये, दोडका 60 रुपये, ढबू 40 रुपये, हिरवी मिरची 60 रुपये, गवारी 60 ते 80 रुपये, कारले 80 ते 65 रुपये, भोपळा 10 रुपये, शेवगा पेंढी 10 रुपये, काकडी 80 रुपये, घेवडा 40 ते 50 रुपये किलो आहे. 

आखाडीमुळे बाजारपेठेत मटण, चिकन, मासे खरेदी वाढली आहे. मासळीची आवक वाढली असली तरी दर तेजीत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना हे दर आवाक्‍याबाहेर वाटू लागलेत. मासळी बाजारात सध्या बांगडा 200, सुरमई 500-600, पॉपलेट 700, कोळंबी 500, रावस 240 रुपये किलो आहे. नदीची मासळी तुलनेत स्वस्त असल्याने मागणी अधिक आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी वाहते आहे. मासेमारी सुरू आहे. रोज ताजे मासे बाजारात विक्रीला येऊ लागलेत. शेंगटा 120, वाम 300, मरळ 300, रावस, कटला 150 रुपयांना किलो आहे. मटण दर साडेचारशे, तर चिकन 180 रुपये किलो आहे. 

Web Title: sangli news coriander