गायीचे दूध उद्यापासून २५ रुपये लिटर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

सांगली - दूध रोको आंदोलनानंतर राज्य शासनाने गाईच्या दुधापासून पावडर निर्मितीसाठी अनुदान जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर बुधवार (ता. १ ऑगस्ट) पासून गाय दुधाची खरेदी किमान २५ रुपये लिटर दराने करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.

सांगली - दूध रोको आंदोलनानंतर राज्य शासनाने गाईच्या दुधापासून पावडर निर्मितीसाठी अनुदान जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर बुधवार (ता. १ ऑगस्ट) पासून गाय दुधाची खरेदी किमान २५ रुपये लिटर दराने करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, याकडे लक्ष  असणार आहे. या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. जिल्ह्यात सुमारे सात लाख लिटर दुधाचे संकलन होते.

मिरजेतील शासकीय दूध डेअरीकडे जिल्ह्यातील दूध संकलन आणि दराच्या माहिती एकत्रीकरणाची जबाबदारी आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार सहकारी, खासगी संघांकडून सरासरी १८ ते २३ रुपये प्रतीलिटर दर दिला जात आहे. काहींनी काही काळापासून दराचे आकडे या संस्थेकडे दिलेच नाहीत. आता एक ऑगस्टपासून  त्यांच्या दराचे आकडे मिळवून अहवाल आयुक्तालयाकडे पाठवण्याची खबरदारी घेतली जाणार का, याकडेही लक्ष असेल. 

जिल्ह्यात २२ सहकारी, बहुराज्य आणि ११ मोठ्या खासगी संघांकडून दूध संकलन होते. खासगी संघांचे संकलन सरासरी ४ लाख ३३ हजार आहे. खासगी संघांकडे साडेतीन लाख लिटर दुधाचे संकलन होते. एकूण गाईचे दूध सात लाख लिटरवर आहे. त्याला सरासरी ३ ते ७ रुपये आता जास्त दर मिळण्याची 
आशा आहे. 

राज्य शासनाच्या आदेशाची सहकारी व खासगी संघांकडून अंमलबजावणी कशी होते, हे महत्त्वाचे आहे. ती झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू.
-राजू शेट्टी,

 खासदार व नेते, स्वाभिमानी 

जूनमधील दर (प्रतिलिटर) 
(स्रोत ः शासकीय दूध डेअरी, मिरज)
वसंतदादा, तासगाव     २१ रुपये ५० पैसे
राजारामबापू      २३ रुपये
फत्तेसिंहराव नाईक शिराळा      २३ रुपये
हणमंतराव पाटील, विटा      २१ रुपये
शेतकरी, कवठेमहांकाळ      २२ रुपये
सोनहिरा, कडेगाव      २१ रुपये
संपतराव देशमुख, कडेपूर      १८ रुपये
यशवंत मल्टिस्टेट      २५ रुपये
चितळे डेअरी, भिलवडी      २२ रुपये
थोटे डेअरी, आष्टा     २५ रुपये
विटा डेअरी      २१ रुपये
 

Web Title: Sangli News cow milk purchase rate Rs. 25 per liter