तग धरलेल्या पिकांसाठी विमा योजना फायद्याची 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सांगली - खरीप हंगाम २०१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ता. ३१ जुलै २०१७ अशी आहे. जिल्ह्यात पावसाअभावी केवळ तग धरून असलेल्या पिकांच्या पार्श्‍वभूमीवर विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग फायद्याचा ठरणार आहे. शासनाने लाभासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. 

सांगली - खरीप हंगाम २०१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ता. ३१ जुलै २०१७ अशी आहे. जिल्ह्यात पावसाअभावी केवळ तग धरून असलेल्या पिकांच्या पार्श्‍वभूमीवर विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग फायद्याचा ठरणार आहे. शासनाने लाभासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. 

पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे,  नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे, वीज कोसळून गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, पावसातील खंड, यामुळे पिकांचे नुकसान होत असते. अशावेळी पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्याकरिता विमा संरक्षण घेणे आवश्‍यक आहे. यासाठी आवश्‍यक हवामानाची आकडेवारी महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळामध्ये बसवण्यात येत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे घेण्यात येणार आहे. 

योजनेमध्ये काढणी पश्‍चात नुकसान भरपाईची देखील तरतूद केली आहे. पीक कापणी झाल्यानंतर  सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांचे अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यास त्याला देखील विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर पुराचे पाणी शेतात शिरून झालेले नुकसान, गारपीट, भूस्खलन या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर  नुकसान भरपाई देण्याची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत नुकसानीनंतर ४८ तासांमध्ये सूचना विमा कंपनीस १८००२००७७१० या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित बॅंकेस देणे  आवश्‍यक आहे.

सहभागासाठी आधारकार्ड सादर करणे आवश्‍यक. 
नसणाऱ्यांनी तातडीने आधार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागाचे आवाहन.
७-१२ खाते उतारा, तलाठी दाखला आवश्‍यक.  

पीकनिहाय भरावयाचा विमा हप्ता व कंसात संरक्षित विमा रक्कम प्रतिहेक्‍टर अशी ः 
 मूग- ३६० रुपये (१८ हजार रुपये), उडीद- ३६० रुपये (१८ हजार रुपये), भुईमूग- ६०० रुपये (३० हजार रुपये), सोयाबीन- ८०० रुपये (४० हजार रुपये), कापूस- २००० रुपये (४० हजार रुपये). भात- ७८० रुपये (३९ हजार रुपये), खरीप ज्वारी- ४८० रुपये (२४ हजार रुपये), बाजरी- ४०० रुपये (२० हजार रुपये), मका -४०० रुपये (२० हजार रुपये), तूर - ६०० रुपये (३० हजार रुपये). 

Web Title: sangli news crop agriculture