बाळासाहेब कांबळेला न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

सांगली - अनिकेत कोथळे याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित युवराज कामटेचा मामेसासरा बाळासाहेब आप्पा कांबळे याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्याकडून चौकशीत महत्त्वाची माहिती "सीआयडी'च्या हाती लागल्याचे समजते. त्याच्या माहितीवर पुढील तपास केला जात आहे.

अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शहर पोलिस ठाण्यातून पोलिसांच्याच बेकर मोबाईल व्हॅनमधून बाहेर नेला होता. बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे आणि इतरांनी विश्रामबागमधील हॉस्पिटलकडे व्हॅन नेली. त्या वेळी तेथे कामटेने नातेवाईक बाळासाहेब कांबळे याला फोन करून बोलावून घेतले होते. तेथे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर कांबळे इनोव्हा गाडी घेऊन बेकर मोबाईलच्या पाठोपाठ कृष्णा घाटापर्यंत गेला होता, असे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला खणभागातील सत्यविजय अपार्टमेंटमधील त्याच्या घरातून त्याला अटक केली होती.

हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाळासाहेब कांबळे कामटेशी बोलताना दिसत होता. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. अनिकेतच्या मृत्यू प्रकरणात पुरावा नष्ट करण्यातही त्याने मदत केल्याचे समजते. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये काही महत्त्वाचे दुवे मिळाले आहेत. त्याला चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपली. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले होते. त्याच्याकडे चौकशी पूर्ण झाल्याने न्यायालयाने पुन्हा त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: sangli news custody to balasaheb kambale