जुन्या वापरात नसलेल्या सायकली द्या आम्हाला

धर्मवीर पाटील
गुरुवार, 17 मे 2018

इस्लामपूर - गरीब, गरजू मुलांना सायकल देण्याचा उपक्रम दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्यावतीने येत्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणार आहे. 

इस्लामपूर - गरीब, गरजू मुलांना सायकल देण्याचा उपक्रम दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्यावतीने येत्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणार आहे. 

इस्लामपूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील जुन्या, वापरात नसलेल्या सायकली आमच्याकडे जमा कराव्यात, आम्ही त्या गरजू मुलांपर्यंत पोहोच करु, असे आवाहन दैनिक सकाळ, इस्लामपूर कार्यालय आणि जायंट्स ग्रुपच्यावतीने केले आहे.

आर्थिक परिस्थिती आणि उपलब्ध सोयी सुविधा, साधनांच्या अभावी शिक्षण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या भूमिकेतून 'सकाळ' आणि 'जायंट्स'ने हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी १ जानेवारीला जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सर्व स्तरातील घटक एकत्र आणले जातात. त्यातून 'सायकल चालवा, निरोगी राहा' असा संदेश देत सायकल रॅली काढली जाते. गेल्या ७ वर्षात या उपक्रमाने उंची गाठली असून त्याचे सकारात्मक परिणाम देखील जाणवू लागले आहेत.

सध्या शाळांना सुट्या आहेत. पुढील महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होताना गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल मिळावी, यासाठी मे मध्येच जुन्या सायकली गोळा केल्या जाणार आहेत. त्या आहे त्या अवस्थेत स्वीकारून दुरूस्त केल्या जातील आणि जूनमध्ये संबंधितांना त्याचे वाटप होईल.

संपर्काचे आवाहन...
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी इस्लामपूर येथील सकाळचे संपर्क कार्यालय तसेच जायंट्सचे अध्यक्ष संदीप राठी, कार्यवाह दत्ता माने यांच्याशी आणि दुष्यंत राजमाने यांच्या राजमाने फर्निचर्स येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Sangli News cycle day function