संभाजीराव भिडेंवरील गुन्हा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे 
यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. तो तातडीने मागे घ्यावा. कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे 
यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. तो तातडीने मागे घ्यावा. कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. 

शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले, ‘‘खोटा गुन्हा दाखल केला असला तरी, सर्वधर्मीयांना भिडे गुरुजींचे कार्य माहीत आहे. या प्रकरणात त्यांचा संबंध नसतानाही गोवले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सरकारी मालमत्तेची नुकसानभरपाईही त्यांच्याकडून वसूल झाली पाहिजे.’’ वीर सिदनाक यांचे १५ वे वंशज अभिजित इनामदार म्हणाले, ‘‘या प्रकरणाशी भिडे गुरुजींचा संबंध नाही. कारण वीर सिदनाक यांच्या समाधीच्या दर्शनासाठी गुरुजी वारंवार येतात.

गुरुजींवर आरोप करणारे दलित नेते प्रकाश आंबेडकर यांची सखोल चौकशी करावी. कशाच्या आधारे ते आरोप करीत आहेत, याचा तपास करावा. कोरेगाव भीमा दंगलीत बळी गेल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
- नितीन चौगुले,
कार्यवाह, शिवप्रतिष्ठान

ते दंगल कशी भडकवू शकतील? आरोप करणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी लोकांना भडकवले जात आहे. इनामदार कुटुंबीय गुरुजींच्या पाठीशी राहील.’’
अभिमन्यू भोसले (मातंग समाज), अंकुश माने (कैकाडी समाज), महेंद्र चंडाळे (वाल्मिकी म्हेतर समाज), दत्तात्रय माळी, प्रदीप बर्गे, धनंजय सूर्यवंशी (मराठा समाज), संतोष लोखंडे (भुई समाज), सचिन पवार (गोल्ल समाज), मनोहर साळुंखे (परीट समाज), अमित करमुसे, संजय बसरगी (गोसावी समाज), गणेश कोयते (चर्मकार समाज), विनायक एडके (धनगर समाज), विजय काबरा (सिंधी समाज), मोहन पतंगे (शिंपी समाज), रोहित नगरकर (कंजारभाट समाज) यांनी भिडे गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. 

Web Title: Sangli News demand of various organizations to withdraw the crime against the Bhide