पडळकरांपासून अंतर ठेवत देशमुखबंधुंची नवी पेरणी

नागेश गायकवाड
सोमवार, 21 मे 2018

आटपाडी - गेल्यावर्षी झालेल्या झेडपी निवडणुकीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांना आमदार केल्याशिवाय डोक्यावर फेटा बांधणार नसल्याची प्रतिज्ञा झेडपीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली होती. पण आता ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिज्ञा ते विसरले आहेत. त्यांनी पडळकर यांच्यापासून अंतर ठेवत नवी राजकिय पेरणी सुरू केली आहे.

माजी आमदार राजेंद्रअण्णा यांनी उमेदवारीची गुगली टाकली तर अमरसिंह देशमुख यांनी तर आमदार होणाऱ्यांनी नीट राहावे. बाबासाहेब देशमुख यांच्या विचारांना धक्का लावाल तर सोबत करणार नसल्याची फटकेबाजी केली. यावर पडळकरप्रेमी आवाक झाले आहेत.            

खानापूर विधानसभा मतदार संघात राजकारणाचे वर्तुळ आटपाडीच्या देशमुख कुटुंबाशिवाय पूर्ण होत नाही. मतदारसंघाचा आमदार ठरवण्यात ते किंगमेकर राहिलेत. 1990 - 99 आणि 2009 मध्ये त्यांनी आमदार अनिल बाबर तर 2003 मध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याशी मैत्री केली. त्या दोघांनाही आमदार करण्यात देशमुख कुटुंबियांचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र निवडणुकीनंतर दोघाशीही फारसे सख्य राहिले नाही.

झेडपी निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्याशी पक्षीय मैत्री जुळली.या निवडणूक प्रचारात अमरसिंह देशमुख यांनी पडळकर यांना आमदार केल्याशिवाय फेटा बांधणार नसल्याची प्रतिज्ञा जाहीर केली होती. त्यामुळे पडळकर प्रेमी खुश होते. या प्रतिज्ञेला जेमतेम वर्ष झाले आहे. पण एक वर्षातच त्यांना या प्रतिज्ञेचा विसर पडला आहे. 

Web Title: Sangli News Deshmukh Brothers Politics