पैठणी, काठापदराची अन्‌ ब्लॉक्रेट कच्छी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सांगली - पैठणी फक्त नावापुरती ‘राणी’ राहिलीय की काय, असं वाटायला लागलं होतं... काठापदराची साडी ही साठीनंतरच्या महिलांनीच घ्यावी, असं चित्र होतं... पण, हलकीच फॅशनची एक झुळूक येते आणि सारे चित्र बदलून जाते... यंदा दिवाळीत साडी बाजारात तेच चित्र पाहायला मिळत आहे. पैठणी, काठापदराची आणि ‘पद्मावती’फेम ब्लॉक्रेट कच्छी या पारंपरिक साड्यांचा बोलबाला आहे. ‘पारंपरिक लूक’चा नवा ट्रेंड साडी बाजाराला बरकत देणारा आहे. 

शे-दोनशे साड्यांच्या ढिगात बसून ‘अजून जरा वेगळी दाखवा’ अशी महिला हमखास फर्माइश करतात. तिथला सेल्समन न थकता शेकडो साड्यांच्या घड्या मोडत असतो. पुन्हा घड्या घालायला एक-दोन स्वतंत्र कामगारच असतात. त्यामुळे महिलांच्या मनावर छाप उमटविणारी साडी शोधून त्यांना विकणं म्हणजे दिव्य. यंदाची दिवाळी नक्कीच त्यांना अपवाद नाही.

मात्र, या वेळी ट्रेंड बदलला आहे. तो पारंपरिक झाला आहे. पैठणी साडी हवीच, असा आग्रह वाढलाय. सेमी पैठणी दीड हजार रुपयांना मिळते. तेथून आठ-दहा हजारांपर्यंत पैठणी उपलब्ध आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’तील अंजलीबाईंमुळे ‘काठापदराची साडी छान दिसते ना’ असा नवा ट्रेंड रुजविला आहे. नऊवारी साडी खरेदी करून पुन्हा ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये शिवून घ्यायची फॅशन जोरात आहे. ही साडी पेशवाई, कासोटा आदी पद्धतीने शिवून दिली जाते. 

गोकुळ साडीचे विष्णूदास तोष्णीवाल म्हणाले, की नेटची व वर्कची साडी यांची मागणी कमी झाली आहे. सिल्क साड्यांची मागणी कायम आहे. मात्र, पारंपरिक लुकने मोहिनी घातली आहे. तरुणींमध्ये घागरा-चोलीचा ट्रेंड आहे.

Web Title: sangli news Dipawali saree market