जिल्हा बॅंकेचे नफ्याचे उद्दिष्ट १०० कोटी - दिलीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सांगली - नोटाबंदी, कर्जमाफीच्या धोरणांचा सामना करीत जिल्हा बॅंक अडचणीतून बाहेर आली आहे. नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नफा घटला असला, तरी येत्या आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींच्या ठेवी, चार हजार कोटींची कर्जे आणि १०० कोटी नफा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. व्यवसाय वाढीसह ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी ‘व्हिजन २०१८’ अंतर्गत जिल्ह्यात उद्या (ता. ११)पासून ग्राहक संपर्क अभियान राबविले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांकडून व्यवसाय वाढीसाठी विविध कल्पना राबविल्या जातात.

सांगली - नोटाबंदी, कर्जमाफीच्या धोरणांचा सामना करीत जिल्हा बॅंक अडचणीतून बाहेर आली आहे. नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नफा घटला असला, तरी येत्या आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींच्या ठेवी, चार हजार कोटींची कर्जे आणि १०० कोटी नफा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. व्यवसाय वाढीसह ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी ‘व्हिजन २०१८’ अंतर्गत जिल्ह्यात उद्या (ता. ११)पासून ग्राहक संपर्क अभियान राबविले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांकडून व्यवसाय वाढीसाठी विविध कल्पना राबविल्या जातात. या स्पर्धेत जिल्हा बॅंक मागे राहणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जात आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात उसाचे कमी झालेले गाळप व नोटाबंदीनंतर इतर उद्योगांवर झालेला परिणाम यामुळे बिगरशेती कर्जात घट झाली. बॅंकेचे सर्वांत मोठे ग्राहक असणाऱ्या साखर कारखान्यांनीही नेहमीपेक्षा कमी कर्जे घेतली. परिणामी, बॅंक उत्पन्न घटून नफा ५१ कोटींपर्यंत घटला. नफा कमी झाला, तरी बॅंकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. ग्राहक राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे आकर्षित होत आहेत. त्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा बॅंकेचे आधुनिकीकरण केले जात आहे. एक लाख ६७ हजार किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध झाले आहेत. त्यांचे वाटपही सुरू आहे. बॅंकेने ८४ हजार रूपे डेबिट कार्डचे वाटप केले आहे. सर्व ठेवीदारांना कार्ड मिळेल. कर्मचारी, ग्राहक हिताचे निर्णय घेतले आहेत. सर्व सोसायट्यांचे संगणकीकरण करून जिल्हा बॅंकेला ऑनलाइन जोडल्या जातील.’’

बॅंकेने व्यवसाय वृद्धीसाठी ‘व्हिजन २०१८’ कार्यक्रम सुरू केला आहे. प्रत्येक तालुक्‍यात ग्राहक मेळावा होतोय. बॅंक अध्यक्ष श्री. पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह संचालक प्रत्येक तालुक्‍यात जाऊन शेतकरी, सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जतमध्ये उद्यापासून ग्राहक संपर्क अभियान सुरू होतेय. कवठेमहांकाळ (ता. १२), आटपाडी (ता. २१), तासगाव (ता. २२), खानापूर (ता. २८), पलूस (ता. २९), कडेगाव ( १ सप्टेंबर), आणि शिराळा येथे ( ता. ४ सप्टेंबर) तालुक्‍यात मेळावा आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील उपस्थित होते.  

पाच गावांत एटीएम...
राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांचे ग्रामीण भागातही एटीएम आहेत. या धर्तीवर जिल्हा बॅंकेने टप्प्याटप्प्याने एटीएम सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बॅंकेचे २५ एटीएम आहेत. दुधगाव, वाळवा, कोरेगाव, अंकलखोप आणि पलूस या पाच गावांत नवीन एटीएम सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Web Title: sangli news District Bank's profit target is 100 crores