सांगलीत कुत्र्याने घेतला पाच जणांचा चावा

विजय पाटील
गुरुवार, 17 मे 2018

सांगली - येथील शहर पोलीस ठाण्याचा आवारातच पिसाळलेल्या कुत्र्यांने धुमाकुळ घातला. त्याने पाच नागरिकांचा चावा घेतला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरूणीचाही समावेश आहे.

सांगली - येथील शहर पोलीस ठाण्याचा आवारातच पिसाळलेल्या कुत्र्यांने धुमाकुळ घातला. त्याने पाच नागरिकांचा चावा घेतला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरूणीचाही समावेश आहे.

घटनास्थलावरून मिळालेली माहिती अशी की आज सकाळी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला. कुत्र्याला पाहून लोक सैरावैरा धावू लागले. यात एका म्हातारीला धावता न आल्याने तिच्या पायाचा चावा कुत्र्याने घेतला. या महिलेस स्थानिक नागरिकांनी रिक्षात घालून ताबडतोब सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. भारती विद्यापीठाच्या काही तरूण याच दरम्यान या रस्त्यावरून जात होत्या त्याच्यावरही या कुत्र्याने हल्ला केला. त्यांचाही चावा या कुत्र्याने घेतला. घटनास्थळी कुत्र्याला पकडण्यासाठी डाॅग व्हॅन दाखल झाली असून कुत्र्यांला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले आहे. 

सांगली मिरजेमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. प्रत्येक चौकात कुत्र्याचे कळप असतात. या आधीही कुत्र्यांनी अनेक जणांना चावल्याच्या घटना घडल्या आहेत. काही लहान मुलांचे लचके सुद्धा तोडले आहेत. मात्र महापालिका या कुत्र्याचा बंदोबस्त करत नाही. अशा घटना घडल्या की कुत्री पकडून परत दुसरीकडे सोडण्यात येतात.

 

Web Title: Sangli News Dog bite to 5 peoples