सांगली शाखेच्या नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

सांगली - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सांगली शाखेच्या पहिल्या पुरस्कारांची घोषणा येथे करण्यात आली. त्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक प्रा. वैजनाथ महाजन, नाट्यलेखक अरविंद लिमये आणि नाट्य तंत्रज्ञ सुरेश आठवले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

येत्या ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भावे नाट्य मंदिरात ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते हा गौरव सोहळा होणार आहे. शाखेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘नाट्य परिषदेतर्फे यावर्षीपासून हे पुरस्कार सुरू करत आहोत. नाट्य क्षेत्रात वाहून घेतलेल्या मान्यवर मंडळींच्या नावे हा गौरव करण्याचा विचार कित्येक वर्षे होता. त्याला यंदा मूर्त स्वरूप येत आहे. काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्काराने डॉ. भवाळकर यांचा गौरव करत आहोत. आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार प्रा. महाजन यांना दिला जाणार आहे.

प्रा. अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्काराने सुरेश आठवले यांचा तर दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्काराने अरविंद लिमये यांचा गौरव करत आहोत. श्री. सावरकर यांच्या हस्ते गौरव समारंभानंतर त्यांचे ‘माझा नाट्य प्रवास’ या विषयावर मनोगत असेल. या सोहळ्यातच कलाकार मेळावाही होणार आहे.’’ श्रीनिवास जरंडीकर, चेतना वैद्य, भालचंद्र चितळे, सनीत कुलकर्णी, विनायक केळकर उपस्थित होते.

Web Title: Sangli News Drama Award declared