राज्यस्तरीय एकांकिकेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सांगली - नव्या दमाच्या तरुणाईचा सळसळता उत्साह आणि तेवढ्यात संवेदनशीलतेने मांडलेल्या विषयाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. येथील भावे नाट्य मंदिरात आयोजित मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

सांगली - नव्या दमाच्या तरुणाईचा सळसळता उत्साह आणि तेवढ्यात संवेदनशीलतेने मांडलेल्या विषयाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. येथील भावे नाट्य मंदिरात आयोजित मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नक्षलवादापासून सत्यघटना आणि सामाजिक संदेशापर्यंतचे विषय नव्या दमाच्या तरुणाईने मांडले होते. 

स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. तब्बल एक लाखाचे पारितोषिक असणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील तीस संघांनी सहभाग घेतला आहे. कालच्या उद्‌घाटन सत्रानंतर ‘विवर’ या एकांकिकेने प्रारंभ झाला. त्यानंतर ज्येष्ठांच्या एकाकी जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘रेड ॲपल’, स्त्री-पुरुषांचे नातेसंबंध दाखवणारी ‘तळ्यातमळ्यात’ एकांकिका गाजली. ‘१२ किलोमीटर’ या सत्यघटनेवर आधारित एकांकिकेलाही प्रेक्षकांनी दाद दिली. आज रविवारची सुटी असल्याने पहिल्या सत्रापासून प्रेक्षकांची गर्दी होती. ‘आफ्टर द डायरी’ या दमदार एकांकिकेने प्रारंभ झाला. त्यानंतर ‘ब्रेन’, ‘हे राम’ या एकांकिका झाल्या. नव्या पिढीने सादरीकरण केलेल्या या एकांकिकेला प्रेक्षकांनीही दाद दिली. 

Web Title: Sangli News Drama Competition