चला, साकारूया ‘इको गणेशमूर्ती’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - नव्या पिढीला पर्यावरण रक्षणाचे मोल समजावे, यासाठी ‘सकाळ-एनआयई’ परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी इको गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा रविवारी (ता. २०) होणार आहे. गांधी मैदान येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत कार्यशाळा होईल. 

कोल्हापूर - नव्या पिढीला पर्यावरण रक्षणाचे मोल समजावे, यासाठी ‘सकाळ-एनआयई’ परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी इको गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा रविवारी (ता. २०) होणार आहे. गांधी मैदान येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत कार्यशाळा होईल. 

कार्यशाळेस ‘एनआयई’ सभासदांसाठी विनामूल्य प्रवेश आहे; तर इतरांसाठी १०० रुपये प्रवेशशुल्क असेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी पाण्याची बाटली, नॅपकीन, रंग, पुठ्ठा व बसण्यासाठी सतरंजी आणावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने अशा मूर्तींचे विसर्जन केल्यास पर्यावरणाला हानी पोचू शकते. त्यामुळे मातीपासून मूर्ती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. यात पाच ते १४ वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येईल. त्यासाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 
‘सकाळ-एनआयई’तर्फे किड्‌स कार्निव्हलसारख्या कार्यशाळा महाराष्ट्र, गोव्यात घेतल्या जातात. यात ७० हजारांवर विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. इको गणेशमूर्ती बनविण्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘एनआयई’ समन्वयक सुशांत पाटोळे (भ्रमणध्वनी ः ८८८८१६६११४) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ईशान’चे सहकार्य 
राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील ईशान स्टेशनरी मॉल कार्यशाळेचे प्रायोजक आहेत. कोल्हापुरातील स्टेशनरी क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या ईशान स्टेशनरी मॉलच्या सारिका भलानी यांचे गतवर्षीप्रमाणे यंदाही सहकार्य लाभले आहे. शालेय, कार्यालयीन, बॅंकिंग कामकाजासाठी उपयुक्त, दर्जेदार स्टेशनरी साहित्याचे विक्रीकेंद्र म्हणून ‘ईशान’ची ख्याती आहे. येथे विविध स्टेशनरी साहित्य एकाच छताखाली उपलब्ध आहे.

Web Title: sangli news eco ganeshmurti