भेसळीच्या संशयावरून ९० हजारांचे खाद्यतेल जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सांगली - भवानीनगर (ता. वाळवा) येथे भेसळीच्या संशयावरून आज ९० हजार ४७१ रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न, औषध प्रशासनाने ही कारवाई केली. सातारा येथील एका कंपनीत हे तेल तयार होते. त्यात भेसळ असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे यांनी सांगितले.

भवानीनगर येथे सदाशिव बाळासाहेब सावंत यांचे दुकान आहे. तेथे तेलसाठा विक्रीसाठी ठेवला होता. तेल विक्रीचा परवाना नसताना ते विकत होते. त्यांना नोटीस देण्यात आली. शिवाय, या तेलात भेसळ झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यात १५ डब्यांतील २२३  किलो सोयाबीन तेल तर  ५५ डब्यातील ८२३ लिटर सरकी तेल जप्त करण्यात आले. त्याचे नमुने  तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, आर. आर. शहा, श्री. कवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, एसटी स्थानकावरून गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला खवा आणि बर्फी नष्ट करण्यात  आल्याचे श्री. कोडगिरे यांनी सांगितले. त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तो मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Sangli News edible oil seized