अंडी उत्पादनात दहा टक्के घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

विटा - खानापूर तालुक्‍यात नागरिकांबरोबर मुक्‍या जनावरांवरही वाढत्या तापमानाचा परिणाम होऊ लागला आहे. चाळीस ते एकेचाळीस सेल्सिअंसपर्यंत पारा वाढत आहे. वाढत्या उष्म्याने पोल्ट्रीच्या कोंबड्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कोंबड्यांचे वजन कमी होणे, खाद्य न खाणे, उत्पादन घटणे असा परिणाम होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक चिंताग्रस्त बनले आहेत. 

खानापूर तालुक्‍यात अंड्यावरील दहा लाखाच्या आसापास कोंबड्या आहेत. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत आहे. ४१ सेल्सिअसपर्यंत तापमान वाढत आहे. त्यामुळे कोंबड्यांची घालमेल सुरू झाली आहे. दररोज दहा टक्के अंडी उत्पादन घटत आहे. उन्हामुळे कोंबड्या खाद्य खाईनाशा झाल्या आहेत. 

कोंबड्यांना तरतरी येण्यासाठी विटामीन सी हे औषध पोल्ट्रीधारक देत आहेत. अधूनमधून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने खाद्य तयार करण्यासाठी तसेच कोंबड्यांवर पाणी फवारणी बंद पडते. त्यामुळे महावितरण वीज पुरवठा खंडीत न करता सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्या कशा जगवायचा असा प्रश्‍न पोल्ट्रीधारकांसमोर पडला आहे. असे पोल्ट्रीधारक शत्रुघ्न जाधव यांनी सांगितले.

कोंबड्यांचा तापमानापासून बचाव 

  •  कोंबड्या खाद्य खाव्यात यासाठी, खाद्यावर पाणी मारले जाते.
  •  पोल्ट्री शेडमध्ये गारव्यासाठी पत्र्याला आतून चुना लावला आहे.
  •  दिवसातून तीन ते चारवेळा मायक्रो स्प्रिंकलरने पाण्याचे फवारे कोंबड्यांवर उडविले जात आहेत.
Web Title: Sangli News Egg production decrease 10 percent