मिरज रोडवरील वानलेसवाडीत अतिक्रमण हटाव मोहिम

विजय पाटील
बुधवार, 7 मार्च 2018

सांगली - मिरज रोडवरील वानलेसवाडी येथील संत बाळूमामा यांच्या मंदिराचे अनधिकृत शेड आज पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार काढण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.

सांगली - मिरज रोडवरील वानलेसवाडी येथील संत बाळूमामा यांच्या मंदिराचे अनधिकृत शेड आज पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार काढण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.

अतिक्रमण काढताना ग्रामस्थ व  भाविकांनी विरोध केला. महापालिकेचे सह उपायुक्त यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. काही काळ वातावरण तंग झाले होते. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शेड काढण्याची प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. .. 

सांगली - मिरज रोडवरील वानलेसवाडी येथे संत बाळूमामा याच्या मंदिरासमोर अनधिकृत शेड बांधण्यात आले होते. सांगली महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये हे शेड उभा करण्यात आले होते. महापालिकेने या संदर्भात आधी नोटीस पाठवली होती. पण हे शेड काढण्यात आले नव्हते. आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घटनास्थळी जाऊन शेड काढले. यावेळी तेथील भाविक आणि नागरिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात महापालिकेच्या सहउपायुक्तांच्या गाडीच्या काचा फुटल्या. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करून बंदोबस्तामध्ये हे शेड काढण्यात आले. 

Web Title: Sangli News encroachment removal campaign in Wanelaswadi