मिरजेचे काँग्रेसचे माजी आमदार हाफिज धत्तूरे यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मिरज - मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे  मध्यरात्री दीडच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षाचे होते.

मिरज - मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे  मध्यरात्री दीडच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षाचे होते.

काल जेवताना त्यांना ठसका लागला. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना येथील मिशन रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र उपचारा दरम्यान त्यांचं निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज ( ता. 14 ) त्यांचा जन्मदिवस आहे, मात्र आजच धत्तूरे यांचं निधन झाले.

मिरज विधानसभा मतदार संघातून 1999 आणि 2004 साली ते सलग दोन वेळा निवडून आले होते. ते काँग्रेसचे निष्ठावान नेते होते. आम आदमीचा आमदार अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर ते आवाज उठवत, वेळ प्रसंगी ते रस्त्यावर उतरून आंदोलनही करत. राजकारणात स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची आेळख होती. दोनदा आमदार होऊनही त्यांची साधी राहणी होती. आमदारकी नंतर ते बऱ्याच वेळा रिक्षातून ही प्रवास करत. 

धत्तूरे हे मुळ बेकरी व्यावसायिक होते. ऑल इंडिया ओ बी सी ऑर्गनायजएशन मार्फत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली, आणि 1999 ची त्यांनी पहिलीच निवडणूक जिंकली. त्यांच्या प्रचारासाठी हिंदी चित्रपट क्षेत्राचे अभिनेते दिलीपकुमार हे मिरजेत आले होते. 

 

Web Title: Sangli News Ex MLA Hafij Dhatture no more